About College

Run by NUTAN SHIKSHAN PRASARAK MANDAL, DESAIGANJ since June,1989
Affiliated to Gondwana University GADCHIROLI
NAAC accreditation "B" Grade
Course available :-
B.A. and B.Com
देसाईगंज (वडसा) हे गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या काठावर वसलेले व चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्हांना जोडणारे एक प्रमुख ठिकाण.गडचिरोली सारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यातील महत्वपूर्ण बाजारपेठ असलेले हे शहर तसे शैक्षणिक दृष्ट्या मात्र मागासलेलेच होते. जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्टेशन असलेल्या या शहरात शिक्षणाची गंगोत्री आणण्याचे श्रेय प्रसिद्ध शिक्षण प्रेमी व क्रियाशील सामाजिक कार्यकर्ते स्व. पंडीत ग्यानचंदजी शर्मा आणि स्व. नारायणसिंहजी उईके यांना जाते. 1958 साली नुतन शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून या समाजहितचिंतकांनी या शहरात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.पुढे या शिक्षण संस्थेची उत्तरोतर प्रगती होत जाऊन 1984 ला आदर्श कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय तसेच 1989 ला आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालय सुरु करण्यात आले. आज महाविद्यालयात बी. ए., बी. कॉम., व एम. ए. (मराठी, समाजशास्त्र व अर्थशास्त्र) हे अभ्यासक्रम सुरू आहेत
      महाविद्यालया द्वारे दिल्या जाणार्‍या उच्च शिक्षणाची गुणवत्ता बदलत्या परिस्थितीत नियमीतपणे तपासणे आवश्यक असते. या साठी सत्र 2014-15 मध्ये महाविद्यालयाने बँगलोर स्थित राष्ट्रीय मूल्यमापन व मानांकन परिषदेला महाविद्यालयात आमंत्रीत करुन समितीने महाविद्यालया च्या  विविध घटकांशी संवाद साधला आणि महाविद्यालयाचा सर्वंकष मूल्यमापन करून महाविद्यालयाला येणाऱ्या 5 वर्षांसाठी 'ब' श्रेणीचा दर्जा दिला आणि महाविद्यालया च्या  शैक्षणिक गुणवतेबद्दल समाधान व्यक्त केलेले आहे. आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यातील अविकसित घटकांना उच्च शिक्षण देणाऱ्या आमच्या महाविद्यालयासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.

हार्दिक अभिनंदन
आमच्या महाविद्यालयाचे गुणवंत विद्यार्थी

1. कु पुनम कुकरेजा
            रा. तु. म. नागपूर विद्यापीठ सुवर्णपदकाची मानकारी
2. कु अमृता माधवदास मोटवानी
           रा. तु. म. नागपूर विद्यापीठ सुवर्णपदकाची मानकारी
3. श्री खुशाल दादाजी अनोले
          रा. तु. म. नागपूर विद्यापीठ सुवर्णपदकाची मानकारी
4. श्री राकेश मुजुमदार
         आंतर विद्यापीठ क्रिकेट संघात सहभाग
5. कु. दुलेश्वरी नैताम
          आंतर विद्यापीठ क्रिकेट संघात सहभाग
6. श्री सुभाष वासुदेव मांदाडे
          रासेयोच्या राज्यस्तरीय पुरस्काराचा मानकरी
7. कु स्मिता श्रीराम निपाने
          रा. तु. म. नागपूर विद्यापीठ रजतपदकाची मानकारी
8. श्री धनंजय सखाराम साखरे
          रा. तु. म. नागपूर विद्यापीठ सुवर्णपदकाची मानकारी
9. श्री प्रणय सुरेश पिंपळकर
          गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली बी. कॉम 4था मेरीट
10. कु स्मिता सुदाम हजारे
            गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली एम. ए. मराठी 5वी मेरीट
11. विजय शामराव सहारे
            गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली बी. ए. 10 वा मेरीट
12. अजय वामन पिलारे
               गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली बी. कॉम 9 मेरीट
13. कु. निशा आबाजी बडोले
                 गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली एम. ए. समाजशास्त्र 2री मेरीट
14. कु. वनिता प्रेमचंद बुध्दे
                       गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली एम. ए. समाजशास्त्र 3री मेरीट
15. आकाश सुरेश पिंपळकर
                     गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली बी. कॉम 1ला मेरीट
16. कु. रुकय्या इब्राहिम शेख
               गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली बी. कॉम  3री मेरीट
17. सुनिल गोपी कुकरेजा
                गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली बी. ए. 3 रा मेरीट